तूच ठरव. . .


आयुष्य म्हणजे जळता निखारा
हवा दिली की जळत राहतो
नाहीतर क्षणात राख होतो 
त्याला धगधगत ठेवायचा की माती बनवायचा 
तूच ठरव

सभोवताली सगळीकडे माणसांचे लोंढे 
त्यांच्यासोबत वहात जायचं 
की नुसत पाहात राहयच
की अनुभवायचं 
तूच ठरव 

जगण्याचा खेळ असा ठरलेला 
एकमेकांवर चाकोरी मध्ये आदळणाऱ्या 
कॅरमच्या सोंगट्या सारखा 
तो मांडून आदळत खेळत राहायचा 
की मोडून टाकायचा 
तूच ठरव 

जगाचं पटांगण, दुसरं कुरुक्षेत्र 
पण सारथी श्रीकृष्णच असेल असं नाही
शस्त्र टाकून द्विधा अवस्थेत रणांगण पाहात राहायचं 
की अर्जुन बनून सार जिंकायचं
तूच ठरव 

रांधा वाढा उष्टी काढा 
पूर्वीचं मागे टाकलेस ना सारं माग 
आता 4G 5G न बदलणाऱ्या युगाची भीती वाटतेय तुला? शिकून सवरून घोड्याला टाच
दिलिच आहेस ना आता
मग घे अासुड अन  दोडव  त्याला तुझ्या ध्येयापर्यंत 

वाऱ्याबरोबर हेलावणारे,
मनात मळभ दाटल्यावर बरसणारे
काळे ढग बनायचं 
की क्षणभरच चमकून 
आभाळ लख्ख करणारी वीज बनायचं तूच ठरव


                            डॉ. चैताली कुलकर्णी

1 comment:

  1. अप्रतिम...महिलादिनादिवशी महिलांना खूप सुरेख संदेश...

    ReplyDelete