शिवजयंती विशेष

मित्रमंडळा मध्ये गेली अनेक वर्ष शिवजयंती निमित्त काही कार्यक्रम किंवा उपक्रम सादर केले जातात. या वर्षी  "रक्तदान शिबीर", "चित्रकला स्पर्धा" आणि "रस्ता सुरक्षा" या विषयावर एक संवाद असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.  

चित्रकला स्पर्धे मध्ये लहानांबरोबर मोठ्यांनीही उत्साहाने भाग घेतला. मोठ्यांसाठी पोस्टर  प्रभागात अनघा बोडस यांना प्रथम क्रमांक मिळाला - 


तर मीनल टोणगावकर आणि शलाका डेगवेकर यांना संयुक्त दुसरे पारितोषिक मिळाले.

चित्र रंगवण्याच्या स्पर्धेत - अवनी पुजारी हिला पहिले तर निमिष बोडस याला दुसरा क्रमांक मिळाला. 


प्रतिक  मोहरीकारला मुलांच्या दुसऱ्या गटातील पहिले तर विप्रा मोहरीकर याना मोठ्यांच्या गटातील रंगकामाचे अनुक्रमे पहिले पारितोषिक मिळाले (ती चित्रे सध्या उपलब्ध नाहीत या बद्दल क्षमस्व!). आभा सेवक हिला tattoo-design साठी पहिला क्रमांक मिळाला.

मोठ्या लोकांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.  या उपक्रमाला जास्त प्रतिसाद मिळावा अशी सर्वच उपस्थितांची प्रतिक्रिया होती.

श्री तांबवेकर यांनी "रस्ता  सुरक्षा" संबंधी उत्तम माहिती सांगितली.  त्यांच्या‘अरुंधती फाउंडेशन’ (http://www.thearundhatifoundation.org.in/) तर्फे त्यांनी हा कार्यक्रम केला.  


Report by - अभिजित टोणगावकर



No comments:

Post a Comment