Friday, December 01, 2017

कट्टा - डिसेंबर २०१७


Picture by Aabha Sewak - class 10

नमस्कार रसिक वाचक हो !

या वर्षीचा म्हणजे २०१७ चा हा कट्ट्याचा शेवटचा अंक. वर्षभरातल्या विविध अंकाप्रमाणे ह्या अंकात सुद्धा अनेक वेगवेगळे पैलू सामावून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. रांगोळी, कथा, कविता यां सोबतच लेख स्पर्धे साठी आलेल्या लेखांमध्ये काही उल्लेखनीय लेख आम्ही या अंकात प्रसिद्ध करीत आहोत.

दोन मुलींची आई असलेली अंशू जामसेनपा ह्या अष्टपैलू गृहिणीने एवरेस्ट ५ वेळा सर करून आणि एकाच आठवड्यात 'डबल असेन्ट' करणारी एकमेव आई असा किताब या वर्षी मिळवला. तिची यशोगाथा सांगणारा लेख ही या अंकात प्रसिद्ध करत आहोत.

शिशिर ऋतू च्या आगमनाची चाहूल देणारं आभा सेवक हिने काढलेलं चित्र मुखपृष्ठावर प्रसिद्ध करीत आहोत.
या बरोबरच नेहमीचे संस्कारमाला,ओळखा पाहू?, why do we? या सारखी सदरे आहेतच.

नवीन वर्षाचा पहिला अंक म्हणजे पुढचा अंक हा 'संकल्प विशेषांक' असणार आहे. त्याला आपण नेहमीसारखाच भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद,


आपले नम्र,
गंधाली सेवकमंजिरी सबनीस 
स्नेहा केतकररश्मी साठे,

वैशाली आकोटकरराजश्री पैठणे,
सारंग गाडगीळअभिजीत टोणगावकर