Winter Paintings

डिसेंबर हा थंडीचा महिना.  पहाटे सगळीकडे पसरलेले धुके, गार वारं, हवेहवेसे वाटणारे कोवळे उन्ह, हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. व्यायाम करून येताना गुलाबी थंडीत अमृततुल्य चहा पिताना स्वर्गसुखाचा प्रत्यय येतो. सकाळच्या थंडीत कोवळे ऊन झेलण्याची मौज न्यारीच असते. हिवाळा हा आल्हाददायक ऋतू आहे. या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर....काही झाडे ओसंडुन बहरत असतात. पाश्चात्य देशात मात्र शिशिर असतो तो हाडे गोठवणारा. झाडांची सारी पाने गळून जातात. सर्वत्र बर्फ पडते. दळणवळणाची साधने ठप्प होतात. पण तरीही चित्रकार लोक यात देखील आनंद शोधतात. सृष्टीचे हे आगळे रूप त्यांच्याच नजरेतून...

ह्या निमित्याने आम्ही कट्ट्यासाठी काही मित्रांकडे त्यांची पेंटिंग मागवली होती. त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे ती आम्हाला पाठवली. त्याबद्दल त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.


हिवाळ्याचा बहर
वॉटरकलर पेंटिंग
१६" x ११.५" कोल्ड प्रेस पेपर 
जयंत वाळवेकर 

चित्रकला हा फक्त एक बालपणीचा छंद म्हणून राहून गेला. वरिष्ठांनी आयुष्यात इंजिनीरिंग मेडिकल हे दोनच रस्ते आहेत हे सांगितल्यानंतर, १२ वीच्या नादातहा छंद मनाच्या अडगळीत कुठेतरी पडून राहिला. कॉम्पुटर इंजिनीयर झालो आणि कामात व्यस्त झालो. जवळपास १० वर्षानंतर बॉब रॉस या अमेरिकन कलाकाराचे काम पाहून चित्रकला, ऑईलकलरच्या स्वरूपात पुन्हा जागृत झाली, पणखूप काळ टिकली नाही. बहुतेक ती वाट पाहत होती चांगल्या गुरूंची. मिलिंद मुळीक सचिन नाईक या प्रसिद्ध कलाकारांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने ती पुन्हा एकदा जागृत झाली आणि सूर गवसला तो वॉटरकलरमुळे.

वॉटरकलरची जादू काही वेगळीच आहे. वाळलेले रंग हे पॅलेटवर निर्जीवपणे पडून असतात. जेव्हा त्यांना पाण्याचा स्पर्श होतो तेव्हा ते एकदम जिवंत होतात. अचानक ते एकदम तेजस्वी होऊन आपले "रंग" दाखवू लागतात. ते रंग ब्रशने उचलून ओल्या कागदावर सोडले की मग अजून एक जादू होते. एखाद्या घरात डांबून ठेवलेल्या लहान मुलाला मोकळ्या हवेत सोडल्याप्रमाणे ते सैराट सुटतात चित्रकाराला झिंगाट करून सोडतात. कोणताही अहंकार बाळगता एकमेकात विलीन होतात. ती पूर्ण प्रक्रियाच एका वेगळ्याच स्वातंत्र्याची जाणीव करून देते. 

या वेळी ही उत्सुकता बराच काळ टिकून आहे. त्यामागे योग्य मार्गदर्शक, ग्रुपमध्ये काम करण्याची मजा, मानसिक प्रसन्नता अशी महत्वाची कारणे तर आहेतच पण काही क्षुल्लक वाटतील अशी कारणे पण आहेत. त्यातील एक कारण म्हणजे माझे विस्कटलेले, ऑफिस मधून आल्या आल्या समोर दिसणारे ते रंगानी माखलेले डेस्क. ते स्वच्छ असण्यात काय मजा! त्या रंगांनी माखलेल्या पॅलेट, ब्रश, पाणी यांचे आमंत्रण लोभनीय आहे.

माझ्यासाठी ही एक प्रकारची साधना आहे जी मला समाधान देते.

जयंत हा व्यवसायाने कॉम्पुटर इंजिनीयर असला तरी प्रत्येक गोष्टीकडे  कुतूहलाने आणि कलात्मक दृष्टीने पाहण्याच्या स्वभावामुळे त्याने बरेच छंद जोपासले आहेत. चित्रकला, फोटोग्राफी, पाककला इतकेच काय तर विज्ञान आणि कॉम्पुटर प्रोग्रामिंगकडेही जयंत कलात्मक दृष्टीने पाहतो.
  
____________________________________________________________________


Autumn / winter
पोस्टर कलर्स
१८ cm x २४.५cm
सौ. श्वेता अनुप साठ्ये

अमेरीकेतील विस्काँन्सिन् स्टेट.
प्रत्येक ऋतुमध्ये निसर्गाच्या निरनिराळ्या छटा दाखविणारा. जणु जीवनाच्याच स्थित्यंतराचे दर्शन घडविणारा. स्प्रिंग पासून विंटर पर्यंत (तान्ह्या वयापासून ते वार्धक्यापर्यंतचे) सर्व रंग तो दाखवितो.
ऑटम...हिवाळा जवळ आला की झाडांच्या पानांचे बदलणारे रंग फारच सुंदर मनमोहक वाटतात. कधी मला ते जीवनाचे सार दर्शविणारे भासतात तर कधी कुटुंबातल्या नात्यांची विविधता मला त्यात दिसते. पोपटी, गडद हिरवा, पिवळा ,नारंगी , तपकिरी अशा कितीतरी रंगांची बरसात करणारा निसर्ग. त्या दिवसांत दिसणारी रंगीबेरंगी सृष्टी जणु स्वर्ग सुखाचीच प्रचिती देते.

त्या ऋतुत रंगीबेरंगी पाने गोळा करणे आणि शेतांमधे , जंगलांमधे पळणारी हरणं शोधत, पाहत गाडीतून फेरफटका मारत फिरणे हा आमचा नेहमीचा आवडीचा छंद. तीच पाहिलेली दृष्यं आणि जमवलेली पानं रेखाटायचा माझा हा छोटासा प्रयत्न. ह्या चित्रातला वृक्ष त्या छोट्या घरकुलास छाया देणारा
, घरकुलाची शोभा वाढविणारा प्रगल्भ, परिपक्व, खंबीर, अनुभवांच्या शिदोरीची आणि प्रेमाच्या रंगांची संपूर्ण कुटुंबावर उधळण करणाऱ्या आईबाबांसारखा भासतो.
    
हे चित्रं पाहून माझ्या एका स्नेह्यांनी ऐकवलेल्या ह्या चार ओळी...
रंगसंगती पानांची
कुटुंबातल्या नात्यांची
का झोपडीस माझ्या देवा तुझीच आस
छाया जणु पित्याची हिमवंत अंगणास
का झोपडीस माझ्या बाबा तुझीच आस
छाया जणु सुखाची हिमवंत अंगणास
रंगसंगती पानांची
कुटुंबातल्या नात्यांची

________________________________________________________________


Fall and Winter in the West
Abstract
Acrylic on canvas.
Deepa Dipak Paranjape
_________________________________________________________




The Solitude
Watercolor Painting
Size 15" x 12"
Minal Abhijeet Tongaonkar
__________________________________________________________



Autumnal Colors
Encaustic Painting
7" x 5" on special paper
Arati Ajit Bedekar


This encaustic painting was done using encaustic iron, hot air gun with encaustic wax colors. It can be done on different surfaces like various kinds of papers, wood, MDF and others. This was done on glossy paper to depict the autumnal colours, a mix of fallen leaves and dried flowers.
_________________________________________________________________

Fall Colors
Oil on canvas.
Aparna Tushar Cherekar

_______________________________________________________________


शिशिराची जादू
 Oil on canvas
१३" x ११ "
मंजिरी विवेक सबनीस


हे पेंटिंग पाहून सुचलेल्या चार ओळी:-
टाकूनी जुने रंग सारे
दुःखाची पाने तू उधळूनी दे
नवआनंदासाठी सज्ज होऊनी
सुखाच्या पानांना तू जागा दे 








2 comments:

  1. Enjoyed paintings!
    It's true about that expression containing 'सैराट' and 'झिंगाट'-the adjectives very well used.

    ReplyDelete
  2. Dear Jayant, perfect realistic painting capturing minute details of layers of snow. Hats off to your skills including creative writing. Keep up good work and we all are proud of your achievements in life. All the best...Jitu Sagare @ Toronto Canada.

    ReplyDelete