माणसं अशी का वागतात ?


माणसं अशी का वागतात?

मी, माझं यापलीकडे पहातच नाहीत
नात्यांच्या बंधनाला जुमानत नाहीत
पुढे-पुढे धावताना, मागचं सगळं विसरून जातात
माणसं अशी का वागतात?
शीड फाटलेल्या गलबतासारखी
दोरी तुटलेल्या पतंगासारखी
दिशा हरवलेल्या पाखरासारखी
माणसं अशी का वागतात?
गरज असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण आधी कोण विचारणार याची वाट बघतात
मोठी सुखं मिळवायच्या नादात
छोटे आनंद हरवून टाकतात
माणसं अशी का वागतात?
समोरच्याला नमवायच्या गुर्मीत
मनातल्या साध्या-सुध्या उर्मी दबून जातात
सगळं कळून न कळल्यासारखं दाखवताना
सुखी आहोत असं भासवतात
पण मनात खूप-खूप दु:खी होतात
कळत नाही.....
माणसं अशी का वागतात?


- मानसी नाईक





1 comment: