मळभ


संध्याकाळ दाटून दिवस थकलेला 
आसमंत सारा  झाकोळून गेलेला 
रंग नभाचा गडद काळवंडलेला 
त्यात कृष्णमेघांचा खेळ रंगलेला 

मनाचेही काहीसे असेच झालेले 
तळापाशी जे खूप सारे साचलेले 
अचानक उसळून वरती आलेले 
मनभरून जसे मळभ दाटलेले 

वाटते आता रिक्त रिक्त व्हावे 
दाटलेले सारे बेधुंद कोसळावे 
अरे मेघांनोआता तरी बरसा 
नितळ करा माझ्या मनाचा आरसा… 
  _______________________________________
अनघा  चौधरी 

No comments:

Post a Comment