रागरंग


माझे परममित्र आणि थोर व्यासंगी योगेश सेवक (असू द्यायांनी जेव्हा  मला रागरंग या कार्यक्रमा बद्दल 'कट्टा' करता लिहायला सांगितले तेंव्हा आधी मी नकारच दिला. कारण मी स्वतः त्या कार्यक्रमात निवेदन केले होते आणि आम्ही त्या दिवशी स्टेज वर जे दिवे लावले त्यावर परत स्वतःच प्रकाश पाडणं म्हणजे रावणासारखे  स्वःच्या गळ्यात हार तुरे घालण्यासारखे झाले असते. आणि आत्मप्रशंसा टाळायला समजा आत्मनिंदा केली असती तर वाचकांनी त्यात विनय, विनम्रता, प्रामाणिकपणा असलेच सद्गुण बघितले असते (म्हणजे झाली परत आत्मप्रशंसाच). 

पण मग नंतर त्यांच्या पत्नी गंधाली सेवक यांनी (बायका नवऱ्यांच्या चुकीची दुरुस्ती करायला टिपलेल्या असत्यात त्याप्रमाणेयोगेश यांचा अभिप्रेत मला समजावून सांगितला कि या कार्यक्रमाबद्दल लिहायच म्हणजे या कार्यक्रमाचा अहवाल किंवा review नसून एक वृत्तांत लिहायचा आहे. म्हणून हे पांढऱ्या वर काळं करायला बसलो आहे. इथे कोणीही कार्यक्रमाचं मूल्यमापन किंवा तौलनिक अध्ययन शोधू नये. सापडणार नाही. आणि आता विनोद पण पुरे झाले म्हणून supreme कोर्टाचा निकाल असला तरी आता या पुढे विनोदाला  तलाक तलाक तलाक.

दर वर्षी मुंबईच्या पहिला पावसाच्या थोडं आधी म्हणजे जेम्व्हा लोकं छत्र्या विकत घेत असतात त्या दरम्यान योगेश सेवक स्वरनादच्या लोकांना गणपतीच्या कार्यक्रम बद्दलची theme कळवतात. मग येत्या शनिवारी किंवा रविवारी कुणाकडे तरी बैठक होते त्यात यजमानाला धरून (यजमान म्हणजे होस्ट, नवरा नव्हे नाहीतर 'यजमानाला धरून' चा वेगळा अर्थ होईल)  - लोकंच हजर असतात. मग थोडं whataspp-whatapp खेळलं जातं.  जुलै सुरु होता होता थोडा रंग यायला लागतो, गाणी नक्की होतात आणि तालमी सुरु होतात. आता या वर्षीची सगळी हकीकत सांगतो. विनोदाला  T T T लागू आहे

 या वर्षीची theme होती शास्त्रीय संगीतावर आधारित मराठी आणि हिंदी गाणी. सर्वात आधी कलाकारांपैकी  कोण कोण  गणपतीच्या वेळेस बंगलोर मध्ये आहे ये बघितले गेले. बहुतेक सगळी मंडळी  बंगलोर मधेच असणार होती. मग कार्यक्रमाचे नाव काय ठेवायचे यावर चर्चा झाली. आम्ही कार्यक्रमाचं नाव ठेवलं 'रागरंग' (तुम्ही नंतर नावं ठेवली ती वेगळी). कार्यक्रमाची अवधी तास ३० मिनिटे असल्याने १४-१५ गाणी घ्यावी असे ठरले.  हे ठरल्यावर काही मूलभूत प्रश्न उभे राहिले. कुठले कुठले राग घ्यायचे? हिंदी गाणी जास्ती की मराठी? कार्यक्रम रसिकांच्या मनोरंजनासाठी  करायचा कि ज्ञानवर्धनासाठी ?  "आता राग शिकायला जन्मसुद्धा कमी पडतो मग ९० मिनिटात आपण काय रसिकांचं रागांविषयी ज्ञानवर्धन करणार ?" असा अकारण शेरा कुणी (स्वरनादची मंडळी माझ्याकडे का पाहत आहे?) तरी मारल्यावर कार्यक्रम मनोरंजनासाठी करायचा हे ठरले.

आता आधी १४-१५ राग निवडायचे आणि त्यावरची गाणी शोधायची कि १४-१५ आवडती गाणी शोधून त्यातले राग (सापडले तर) शोधायचे असा एक प्रश्न पडला. हा प्रश्न जगातल्या बहुतेक प्रश्नांसारखा कुणी हि लक्ष ना दिल्या मुळे आपल्याआपच सुटला. काही ठळक राग निवडले गेले त्यातली गाणी शोधली गेली आणि काही गाणी निवडून त्यातला राग शोधून काढण्यात आला. "कुहू कुहू बोले कोयलिया " हे गाणं यात राग असल्यामुळे पॅकेज ऑफर म्हणून निवडले गेले.  त्याशिवाय "सर्वोपचारार्थे अक्षदां समर्पयामि" ला अनुसरून  जे ठळक राग १३-१४ गाण्यात आले नाही त्या रागांसाठी चांगले -१० राग असलेली रागमाला हि घेण्यात आली.
 
पुढचे प्रश्न म्हणजे गाणी कुठल्या पट्टीत म्हणायची?  त्या पट्टीचे तबले आहेत कि नाही?.  गाण्याचा orchestra कसा बसवायचा? निवेदन कुणी करायचे? "मी निवेदन करीन" असा कुणी तरी आगाऊपणाने म्हणाल्या मुळे आणि त्याला नाही म्हणता ना आल्या मुळे हा प्रश्न पण आपल्याआप सुटलातालाची जबाबदारी अभिनय पाध्ये आणि नितीन कुलकर्णी आपसात वाटून घेणार होते पण सुरांच्या Orchestra करता कुणी विशेष हातभार लावल्यामुळे सगळी जबाबदारी चिन्मय कोठेकर यांच्या वर आली.  ज्योती कुलकर्णी अभंग आणि लावणी, आभा जोगळेकर यांनी क्लासिकलचा भाग जास्त असलेली आणि नवीन गाणी आणि लीना गोखले यांनी वरच्या सुरात गायली जाणारी गाणी निवडली. केदार कुलकर्णी यांनी अभंग आणि शास्त्रीय गाण्याकडे झुकणारी गाणी, आणि योगेश सेवक यांनी पाश्चात्य orchestra असलेली पण रागावर आधारित असलेली गाणी निवडली. चिन्मय यांनी "तेजो निधी लोह गोल" सारख्या कठीण गाण्याची तय्यारी दाखवली.
मग तालमीला रंग येत गेला. आमचा कार्यक्रम जरी विनामूल्य असला तरी आमची तालीम आम्ही तिकीट लावल्या शिवाय कोणाला ऐकवत नाही. कार्यक्रमाची आणि स्टेज ची भीड नसल्याने तालमीत गायक आणि वादक वेगळ्या रंगात असतात. म्हणून तालमीत गायकांनी घेतलेल्या सुंदर जागा, वादकांनी वाजवलेले तुकडे, त्या शिवाय सतत चाललेले विनोद, चुका आणि दुरुस्त्या आणि शेवटी खान पान या सगळ्याचा मी वृत्तांत सुद्धा लिहिणार नाही. इच्छुक रसिकांनी योगेश सेवकयांच्या कडे पुढच्या वर्षीच्या तालमीच्या तिकीटाची चौकशी करावी.
मग उगवला दिवस कार्यक्रमाचा. रंगीत तालीम एकदा प्रत्यक्ष हॉल मध्ये झाली पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा होती. म्हणून आधी आदल्या दिवशी रात्री त्या दिवशीचे गणपतीचे सगळे  कार्यक्रम संपल्यावर मग तिथे रंगीत तालीम घ्यावी असा विचार होता पण बंगलोरचा ट्राफिक गृहीत धरता तसे जमले नाही. म्हणून कार्यक्रमाच्या दिवशीच - तास आधी हॉल वर यावं आणि आपापला घसा, बोटं इत्यादी साफ करून घ्यावं असे ठरले.
ठरल्या प्रमाणे सगळी मंडळी कार्यक्रमाच्या आधी जमली. योगेश सेवक नेहमी प्रमाणे साऊंड सिस्टिमचे  गणित जमावत होते.  गायक मंडळी लवंग, विलायची, पेपरमिंट असल्या गोष्टी तर वादक मंडळी पान आणि सुपारीचा साठा करून ठेवत होते. मग कार्यक्रमाकरिता घालायचे कपडे चढवण्यात काही वेळ गेला. मग उरलेल्या वेळात वाद्य लावणे, माइक आणि त्याचा आवाज adjust करणे असल्या गोष्टी पण उरकल्या गेल्या. सज्ज होऊन आम्ही कार्यक्रमाच्या आधी होणाऱ्या  गणपतीच्या आरतीला आलो. आरतीत सूर आणि ताल चुकत असल्याची कुरकुर कुणी तरी केलीच.   कुणीतरी (माझ्या कडे बघू नका) "प्रेक्षक आणि सादरकर्ते यांच्या संख्येत चढाओढ लागो" हा दरवर्षीचा विनोद परत करत होतं
आरती नंतर गर्दी जमली होती पण ती आमच्या कार्यक्रमासाठी नसून त्या आधी लहान मुलींचा भरतनाट्यमचा कार्यक्रम होता त्यासाठी होती असे आम्हाला वाटत होते. लहान मुलींचा भरतनाट्यम फारच सुंदर झाला विशेषतः दशावतार. हा कार्यक्रम संपल्यावर हि पुष्कळ लोक आम्हाला ऐकायला हजर होती ये बघून आम्हाला हि उत्साह आला. कार्यक्रम कधी सुरु झाला आणि कधी संपला हे  आम्हाला कळले नाही. कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. प्रसिद्ध गाणं सादर केल्या वर टाळ्या हमखास वाजतातच कित्तेक वेळेस लोक गाणं चांगलं झालं या पेक्षा गाणं संपलं या आनंदात हि टाळ्या वाजवतात. पण आम्ही तालिमीच्या वेळेस ज्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत असतो उदाहरणार्थ गाण्यातली कुठली जागा, किंवा वाजवायला कठीण असा ठेका किंवा चाल. जेव्हा प्रेक्षक त्या बारीकी समझतात आणि तिथे बरोबर टाळ्या वाजवतात तेंव्हा कलाकाराचा उत्सव आपल्या आप वाढतो. या कार्यक्रमातही आम्हाला अत्यंत responsive असे श्रोते लाभले.
एकूण गणपती हा सण स्वरनादच्या मंडळी करता फार दुहेरी आनंददायक असतो. गणरायाचं आगमन हे एक कारण आणि तुमच्या समोर कार्यक्रम सादर करणे आणि त्या साठी तय्यारी करणे हा दुसरा. चला पुढल्या वर्षी  परत भेटू. 
सचिन गोडबोले





No comments:

Post a Comment