नवीन घर


"शी बाबा! किती दिवस इकडे राहणार आहोत आपण?" कंटाळून त्याच्या छातीवर डोकं टेकत ती म्हणाली.
"
हम्म... टीव्हीवरची नजर न हटवता तो हुंकारला.
"
हम्म काय बावळट, तो टीव्ही बंद कर पहिले! ते बिग बॉस महत्वाचं आहे का माझ्यापेक्षा? " ती.
"
अर्रे काय, बघू दे न जरा!" तो.
"
नाही! मला सांग, आपण नवीन घर केव्हा घेणार आहोत?" ती.
"
या घराचे हप्ते फेडताना नाकी नऊ आलेत माझ्या आणि तुझ्या... नवीन घर कुठे घ्यायला चाललीस?? काय खाणार आहेस ते सांग,  नाहीतर मी भुर्जी बनवतो!" तो.
"
काही नको तुझी भुर्जी, मी बनवते! भांडी मात्र तू घास आज!" ती.
शालवी आणि रोहितमधला हा दर आठवड्यातला संवाद.

दोघेही एका प्रायव्हेट फर्म मध्ये नोकरीला. पगार खूप नाही पण सर्व कट होऊन महिन्याला काही रक्कम शिल्लक पडेल इतका बरा. लग्नाला दोनच वर्षं झालेली, त्यामुळे मूलबाळ नाहीच. 

वयाच्या पंचविशीत जसं जमेल तसं लोन काढून दोघांनी वन बीएचके फ्लॅट बुक केला होता. थोडी आड रस्त्यालाच होती त्यांची सोसायटी, यायला-जायला त्रास होताच, परत पाण्याचेही प्रॉब्लेम्स होते; पण स्वतःचं घर म्हणून दोघांची काहीच तक्रार नव्हती. हो, पण काही निरुपयोगी नातेवाईकांची मात्र जोरदार तक्रार असायची, "काय इतक्या लांब घर घेतलंय, कोणी येऊ नये म्हणून का? हाहाहा!"
दोघांचं पण डोकं सटकायचं. पण दोघे शक्य तितकं इग्नोर करायचे.
दोन वर्षं तिकडे काढल्यावर शालवीच्या डोक्यात नवीन घर घेण्याचे विचार येऊ लागले.

ऑफिसजवळची एक नवीन बिल्डिंग तिच्या मनात भरलेली. पण प्रॉब्लेम असा होता की त्यातल्या वन बीएचकेचीच किंमत त्यांच्या या फ्लॅटपेक्षा तीन पट जास्त होती.
रोहितचीही काही कॅल्क्युलेशन होती. त्यालाही पुढील दोनतीन वर्षांत फ्लॅट बुक करायचा होताच.

पण शालवीला जो हवा होता तो बजेटच्या फारच बाहेर होता.
एकदा यावरून त्यांचं भांडण पण झालं.
एरवी समजूतदारपणे वागणारी शालवी खूप हट्ट करायला लागली होती.
रोहितला आता तिला समजावणं जड जात होतं. 

एक दिवस शालवीला चांगल्या दुसऱ्या नोकरीची संधी चालून आली. पगार खूप म्हणजे खूप जास्त होता; रोहितच्या पगारापेक्षाही जास्त होता. आपल्या जास्त पगारामुळे रोहितचा मेल इगो दुखावला जाईल या बावळट कल्पनेमुळे ती नवीन संधी सोडू पाहत होती. 

दिवस असेच जात होते. एके दिवशी रोहितला शालवीची मैत्रीण भेटली आणि बोलता बोलता त्याला शालवीला मिळत असलेल्या नवीन नोकरीबद्दल समजलं आणि ती संधी का अॅक्सेप्ट करत नाहीय त्यामागचं कारणही.
रोहित घरी आला. शालवीला यायला जरा लेटच झाला.
आल्या आल्या तिने,  "सॉरी सॉरी, आज लेट झाला, थांब हं मी पटकन बनवते जेवण." हे म्हणायला सुरू केलं.

रोहितने तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हटलं, "ए म्हशे, मी बनवलंय आज जेवण. फ्रेश हो, मी ताटं घेतो वाढायला!"
शालवी फ्रेश होऊन येईपर्यंत रोहितने ताट वाढून ठेवलेलं व्यवस्थित.
शालवी खूश झाली.
"
वाह, पाव भाजी! आज कशी काय? " ती.
"
सेलिब्रेशन साठी डियर!" तो.
तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह!
"
सोनू, मला सांग, जर मला नोकरीमध्ये खूप मोठी संधी चालून आली तर तू खूश होशील न?" तो.
"
ए बावळट, हा काय प्रश्न? ऑफकोर्स आय विल बी हॅपी मोअर दॅन एनी थिंग! पण का रे?" ती.
"
नाही, सहज विचारलं मी." तो.
"
हम्म, चल, फुटेज का खातोयस? सांग न, का विचारतोयस. तू नवीन जॉब शोधतोयस का? की तुला जॉब मिळालाय आणि त्याचंच सेलिब्रेशन आहे हे?" ती.
"
अम्म... जेवून घे न, मी आईस्क्रीम आणलंय ते खाता खाता बोलू." तो.
तिने खुशीतच जेवण संपवलं आणि आईस्क्रीमची वाट पाहू लागली.
त्याने मस्त अंजीर फ्लेवर आणलेला तिच्या आवडीचा. तिने एक मोठ्ठा घास तोंडात भरत म्हटलं, "हाँ बॉल ऑटॉ!"
तो बोलू लागला, "मला समज संधी मिळाली खूप मोठी..."
"
टॉर मॉला ऑनाँद हॉईल." कारण अजून एक मोठा चमचा तिने तोंडात कोंबलेला!
"
बोल न पुढे, कळलं मला तुला संधी मिळतेय ती..." ती
"
आणि तुला संधी मिळाली तर मला आनंद होईल असं तुला वाटतं की नाही वाटत?" तो.
ती खाण्यात मग्न...
"
ए गधडे, आईस्क्रीम कधी खाल्लं नाहीस का? काय बोलतोय मी? प्लेट चाटून झालीय, आता खायचीय का ती पण?" परत तोच पण जरा चिडून.
"
ओके, सॉरी!  हो तुला पण आनंद होईलच न!" ती.
"
मग या आनंदापासून गेले दोन आठवडे मला लांब का ठेवलंस?" तो.
तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"
काय ग, काय विचारतोय मी?" तो.
"
लुक, आय वॉन्टेड टू टेल यू धिस, बट..." ती.
"
बट व्हॉट? एक मिनिटं तुला असं वाटलं का की तुला जास्त पगार मिळेल तर मी हर्ट वगैरे होईन किंवा ईनसिक्युर होईन? "  तो
तिला आता रडायला येऊ लागलं.
"
मला आज चैतन्या भेटली, तिने मला याबद्दल सांगितलं आणि तू ही संधी वाया का घालवतेयस याचं कारणही!" तो.
आता तिने रडणं सुरूच केलं.
"
यंदा आपल्या लग्नाला 2 वर्षं आणि आपल्या रिलेशन ला 10 वर्षं पूर्ण झाली. किती? 10! आणि तू मला अजूनपर्यंत समजू शकली नाहीस यापेक्षा वाईट काय असू शकेल गं?" तो.
आता रडण्याचा आवाज वाढला होता.
"
हे बघ, मला तुला सांगायचं होतं, पण मला टेन्शन आलेलं. मला खरंच वाटलं की तू हर्ट होशील. मी खरंच तुला ओळखण्यात चूक केली. आय अॅम सॉरी... खरंच सॉरी." ती
तिला जवळ घेत त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं, "मूर्ख मुली, खरं तर आज मला पण नवीन जॉब लागलाय. गेले 2 महिने मी याच नोकरीच्या खटपटीत होतो. आज मला फायनल कॉल आला. 15 पासून जॉईन व्हायचंय. हां... पगार कदाचित तुझ्यापेक्षा जरा कमीच असेल, पण मला काही प्रॉब्लेम नाही!"
तिला अजूनही काय चाललंय ते कळत नव्हतं.
"
अग अशी बघतेय काय? तुझ्या नवीन नोकरीची न्यूज आधी दिली असतीस तर डबल सेलिब्रेशन नसतं का केलं? "
ती काही न बोलता त्याच्या कुशीत शिरली.
"
उद्याच मी माझा होकार कळवून टाकते. तुला माहीत नाहीय किती मोठं बर्डन तू कमी केलंस माझ्यावरचं. कसं काय जमतं तुला रे इतकं शांत राहणं? " ती
"
उगाच का प्रेमात पडलीस माझ्या?" तो
"
बस, जास्त लाल करू नको स्वतःची,  दे... ते उरलेलं आईस्क्रीम पण दे मला." ती.

दोन वर्षांनंतर एक छानशी परी त्यांच्या आयुष्यात आली आणि हो... नवीन घरातही!

अनिष्का

No comments:

Post a Comment