कट्टा - डिसेंबर २०१६



अनुक्रमणिका 


लेख


कविता


आणि बरेच काही...



नमस्कार मंडळी,  
आमच्या दिवाळी विशेषांकाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार. गेला पूर्ण महिना भारत आणि अमेरिका ह्या दोन महासत्ता सतत चर्चेत राहिल्या. भारत नोट Politics ह्यासाठी तर अमेरिका वोट Politics ह्यासाठी. त्याबद्दल उलट-सुलट चर्चा अजूनही सुरु आहेत. आम्हीही आमच्या कट्यावर त्याबद्दल वाचकांचे अभिप्राय देत राहू. डिसेंबर च्या अंकात आम्ही सर्व चर्चेत असणारे विषय घेतले आहेत. वेगवेगळ्या विषयांचे लेख आणि कविता आम्ही यावेळी सिलेक्ट केल्या आहेत. 

डिसेंबर हा थंडीचा महिना.  पहाटे सगळीकडे पसरलेले धुकेगार वारंहवेहवेसे वाटणारे कोवळे उन्ह, हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. व्यायाम करून येताना गुलाबी थंडीत अमृततुल्य चहा पिताना स्वर्गसुखाचा प्रत्यय येतो. सकाळच्या थंडीत कोवळे ऊन झेलण्याची मौज न्यारीच असते. हिवाळा हा आल्हाददायक ऋतू आहे. या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.पाश्चात्य देशात मात्र शिशिर असतो तो हाडे गोठवणारा. झाडांची सारी पाने गळून जातात. सर्वत्र बर्फ पडते. दळणवळणाची साधने ठप्प होतात. पण तरीही चित्रकार लोक यात देखील आनंद शोधतात.  ह्या निमित्याने आम्ही कट्ट्यासाठी काही मित्रांकडे त्यांची पेंटिंग मागवली होती. त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे ती आम्हाला पाठवली. सृष्टीचे हे आगळे रूप त्यांच्याच नजरेतून ...

नविन वर्षाच्या संक्रांत विशेष अंकासाठी आम्ही ' गोड बोलणे' हा विषय घेउन येत आहोत. आपण सर्वानीच आपल्या आजीकडून तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा म्हणजे काही कमी पडायचे नाही असे ऐकले होते. गोड बोलण्याने बरेचदा आपली कामे होतात पण काही वेळा अंगावर शेकण्याची पण शक्यता असते. काही वेळा मजेदार प्रसंग घडतात. तर काही वेळा दुख:द प्रसंगही घडू शकतात. 

ह्या अनुषंगाने काही आनंदाचे, गमतीचे, कधी तणावपूर्ण तर कधी भांडणाचे अनुभव तुम्हाला ह्या अंकात मांडता येतील. तेव्हा तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं किंवा तुमचे अनुभव आम्हाला लेख, कथा, कविता, चित्र गाणे ह्या रूपात 10 डिसेम्बर पर्यन्त mitramandalkatta@gmail.com  ह्या पत्त्यावर नक्की पाठवा. विषय गोड आहे, त्यामुळे तुमच्याकडून नक्कीच भरघोस प्रदिसात येईल ह्याची खात्री आहेच. विषयाव्यतिरिक्तही साहित्य पाठवू शकता.  तेव्हा वाट पाहतो.

आपली 
मित्रमंडळ कट्टा समिती 2016
मंजिरी विवेक सबनीस- संपादक व ब्लोग संयोजक, स्नेहा केतकर- सहसंपादक, रश्मी साठे- मुद्रित शोधक
गंधाली सेवक, रूपा भदे, रुपाली गोखले व राधिका बागुल- जनसंपर्क 

या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखांमधे मांडलेले विचार व मते ही सर्वस्वी ते पाठवणार्‍या लेखक वा लेखिकेची आहेत. संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.

No comments:

Post a Comment