बस सहजच


परवा ऑफिस वरुन परत येताना तो दिसला. स्टेशनवर उभा होता कुणा मित्रासोबत. मी त्याला पाहिलं दुरुन. लक्ष नव्हतं त्याचं, पण मी तिथुनच पास होणार होते.
११ वर्षापुर्वीची माझीच गोष्ट आठवली मला. कॉलेज मधले ऑस्सम दिवस! इतरांचं पाहुन माझ्यावर ही कोणीतरी प्रेम करणारं असावं असं वाटायचं. पण छे.... माझ्या गुटगुटीत पणामुळे शेंबडं पोर ही मला भाव द्यायचं नाही, तिथे स्मार्ट मुलांची काय कथा. बरं घरातुन ही मी काही अंबानी ची मुलगी नव्हते. कपडे, बॅग, चपला ही नॉर्मल. ग्लॅमर नावालाही नाही.

वाटायचं खुप की आपण ही बाकिच्यांसारखं एन्जॉय करावं पण कॉन्फिडन्स कुठे होता??
थोडक्यात काय तर बोअर मुलगी होते मी. पण तरी मला कॉलेजातले दिवस ऑस्सम- बिसम वाटतात.
एकदा कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शनला तो भेटला. माझ्या एकुलत्या एक मैत्रिणीचा कझिन.. कस्सला क्युट होता. ती पण इतक्या स्मार्ट मुलाची बहिण म्हणुन त्याच्यासोबत मिरवुन घेत होती. माझी पण तीने ओळख करुन दिली. आयाई गं... किती गोड हसत होता तो. तो आमच्या कॉलेज मधे नवखा आणि मी कॉलेज मधली असुनही एकटी. मैत्रिण भिरभिरत होती तीच्या हॅंडसम भावाला एकटं टाकुन.
"
तु डान्स मधे पार्टिसिपेट नाही केलंस?"

त्याने हे विचारलं आणि मला फिस्सकन हसायला आलं..  
"मी डान्स केला तर कॉलेजला फुकट खर्च करावा लागेल" ... मी
त्याच्या चेहर्यावरचं प्रश्न चिन्ह पाहुन मला अजुनच हसायला आलं.
"अरे मी नाचले तर स्टेज नाही का तुटणार?" 
त्यावर तो हसला... आणि त्याच्या हनुवटीला हसल्यानंतर पडणारी खळी मी पाहिली. बस्स तो एकच सेकंद त्याच्या प्रेमात पडण्यास पुरेसा ठरला. दुसर्याच दिवशी ऑर्कुटवर त्याला शोधुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याने ती त्याच दिवशी अॅक्सेप्ट केली. मी तर लगेच त्याचे फोटो वगैरे पाहुन आले.. सर्व चेक केलं.
हुश्श.... तो कमिटेड नव्हता
नंतर चा एक महिना फक्त त्याच्याशीच चॅट करण्यात आणि फक्त त्याच्या विषयी छान छान विचार करण्यात गेला. मैत्रिणीशी बोलताना सतत त्याच्याबद्दलंच बोलायचे. तीला ही माझं गोड गुपित कळ्ळं होतं
आमची मैत्री वाढली. तो आणि मी चांगले मित्र झालो. फोन नंबर ही एक्सचेंज झाले. बहुतांश मीच फोन करायचे. बहुतांश म्हणजे सर्वच वेळ.
तो आय टी ईंडस्ट्री मध्ये होता. बिझी असायचा.. पण माझ्या फोन ला मात्र कधी इग्नोर नाही केलं त्याने. आमची मैत्री फोनवरच फुलत होती. आणि त्या मैत्रीला मी प्रेम समजु लागले होते. मी खुष होते. खुप खुप खुष होते.. 
एकदा तो स्वताःच म्हणाला, "किती दिवस फोनवर बोलणारेस? चल आज मी तुला भेटायला येतो."
स्वर्गीय अनुभुती काय असते हे त्याक्षणी जाणवलं.
मी त्यातल्यात्यात चांगला ड्रेस घालुन कॉलेज ला निघाले. कॉलेज मध्ये पण कश्शात म्हणुन लक्ष नव्हतं माझं.
डोळे घड्याळाकडे लागलेले.. वेळ पण आज जीवावर आल्यासारखा पुढे सरकत होता. माझं वागणं कदाचित ईतकं ऑब्व्हीयस होतं की पाठुन एका टवळीने कमेंट ही पास केली, "जाडी आज डेट बिटला चाल्लीय वाटतं
मला ओरडुन सांगावसं वाटलं, "हो गं भवाने, डेटलाच चाल्लीय. ते ही तुझ्या बॉयफ्रेंड पेक्षा स्मार्ट मुलासोबत."
पण मी ईग्नोर मारला. मला आज माझा मुड खराब करायचा नव्हता.
लेक्चर चालु असतानाच त्याला प्रपोज करावं का...  हा विचार मनात येऊ लागला. आणि कॉलेज सुटेपर्यंत तो पक्का ही झाला.
त्याने भेटायला बोलवलेलं त्या ठिकाणी मी १५ मिनिट आधीच पोहोचले.
तो तब्बल पाऊण तासाने आला. सॉलीड  दिसत होता. माझ्या डोळ्यात बदाम वगैरे उमटले.
"
छान दिसतेयस." - तो.
मी उत्तरादाखल फक्त हसले.
"
तुला काही सांगायचय".  - तो.
"
मलाही ." - मी
"
काय? - तो
"
तु आधी सांग "- मी
"
हम्म.... तु प्रेमात पडली आहेस का?? - तो
मी दचकलेच. याला कसं कळ्ळं?? मी काहीच बोलले  नाही.
मी ऊगाचच नाही बोल्ले. पण तो पिच्छाच सोडेना . मग मीच बोलले ," तु सांग मग मी सांगेन".
त्याने एक मोठ्ठा पॉझ घेतला मग बोलला, " माझ्या लग्नाला बोलवायला आलोय तुला".....................................

स्टेशनवरील कुठल्याश्या अनाऊंसमेन्ट ने माझी तंद्री मोडली. समोर तो मित्राशी बोलत अजुनही उभाच होता. जमतेम १५ पावलांचं अंतर आम्हा दोघांत पण त्यामध्ये मन कित्ती कित्ती कुठे कुठे फिरुन आलं. विचार करता करता मी तो उभा होता तिथपर्यंत पोहोचले. त्याने मला पाहिलं.
मी तिथे पोहोचल्यावर पटकन माझा हात पकडला आणि मित्राला म्हणाला, "पाहिलंस माझी बायको अजुनही मला वाट पाहत थांबवुन ठेवत नाही. चल आम्ही निघतो". मित्र गेल्यावर त्याने मला विचारलं, "तिथे मिनिट ऊभी राहुन काय पाहत होतीस वेंधळ्या सारखी? मला वाटलं तुझा गजनी झाला की काय?".
"काही नाही तु ज्या दिवशी प्रपोज केलं तो दिवस आठवत होते." - मी
"होमाझ्या लग्नाचं बोललो तर किती रडवेली झालेलीस." - तो
"तर काय, मला वाटलं मी जाडी, तु हिरो... तुला मी कशी आवडणार". - मी
" मॅडम माझ्या क्युट टेडी बेअर ला जाडं बोलायचं काम नाय हा. तुझ्या आवडत्या वरुण धवन च्या मुव्ही चे तिकीट्स बुक केलेत. येण्याची कृपा कराल???  ". - तो
मी उत्तरादाखल फक्त हसले


-अनिष्का


No comments:

Post a Comment