हाक आदिमाची - राजलक्ष्मी देशपांडे

पाऊस असा कोसळला की हरवून गेली वाट
विरघळले अवघे विश्व या उदंड वर्षावात!

ना उरली पृथ्वी, वायू ना तेज, नाही आकाश 
ब्रह्मांडा वेढुन उरला हा असा धुंद पाऊस 

जे दिसे, स्पर्शता येते दृष्टीस पडेना तेही
अन् आकाशा पलीकडले डोळ्यात दाटुनी येई

ही ओढ अनावर कसली? की हाक तुझी आदिम
या प्रलयातूनच दिसते मज माझे घर अंतिम

का हाक अशी प्राणांना तू आवेगाने देसी?
तुज कळते पाऊल त्यांचे अडखळते देहापाशी! !

- सौ. राजलक्ष्मी देशपांडे

1 comment: