प्रवास मित्रमंडळाच्या स्मरणिकेचा!

परवा राजनकर काकांशी बोलताना त्यांच्याकडून बरेच  सोव्हेनीरचे अंक मिळाले. ८० साली मंडळाची स्थापना झाली, आणि ८३ सालापासून मंडळाच्या कामाला काही स्वरूप द्यायच्या हेतूने वर्गणीच्या व्यतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी, सोव्हेनीर प्रकाशित करायचे ठरले आणि त्यात जाहिराती मिळवण्याचे प्रयत्न चालू झाले

८३ सालापासून आजपर्यंत हे सोवेनिर प्रकाशित होत आहे. २००३  ते २००९ या दरम्यान कधीतरी सोवेनिरची स्मरणिका झाली असावी. 'कधीतरी' म्हणण्याचे कारण - राजनकर काकांकडे १९९३, ११९५, १९९९, २००४ ते २००८ या अंकांच्या प्रती नव्हत्या. २००३ मध्ये सोवेनियर आहे, २००९ मध्ये त्याला स्मरणिका म्हणतात - तेव्हा मध्ये  कधीतरी हे  पुर्नबारसे झाले असणारपहिला अंक १९८३ चा आहे, शेवटचा २०१६ चा - आणि मधले वर सांगितलेले काही अंक या विश्लेषणात नाहीत



सोवेनियरच्या अंकात इंग्रजीचे प्रामुख्य अगदी ९४-९५ पर्यंत जाणवते. ८४ सालचे शीला खर्चे यांचे मराठीतले अध्यक्षयीय सोडले तर सुरुवातीच्या बऱ्याच  अध्यक्षयांनी इंग्रजीचाच आधार घेतलेला दिसतो. किंबहुना सोवेनियरची स्मरणिका झाली तेव्हापासून मराठीला किंवा मराठीत व्यक्त केलेल्या विचारांना प्रामुख्य मिळाले. याचे एक कारण असेही असू शकेल, की, साधारणपणे ९५-९६ पासून, सोवेनियर फक्त जाहिरात प्रकाशित करण्याचे पुस्तक न राहता त्यात इतर लेखही येऊ लागले, ऑफसेट प्रिंटिंगमुळे मराठी छपाई सोपी झाली असणार

तर मंडळाचे अध्यक्ष. ८६ सालच्या स्मरणिकेपासून आतापर्यंतच्या  अध्यक्ष्यांची यादी देण्याची पद्धत चालू झाली - ती आजपर्यंत कायम आहे. सुरुवातीला सर्व जाहिरातदारांची यादीही देण्याची पद्धत होती - ती मध्ये कधीतरी बंद पडली - मग परत पुढच्या अंकात परत दिसते. प्रत्येक अंकात त्या त्या वेळच्या कार्यकारिणीची यादी आहे. अगदी पहिल्यापासून मण्डळाच्या सभासदांची यादी मात्र न चुकता प्रत्येक अंकात आहे. त्याबद्दल थोडे विस्ताराने पुढे येईल. हरीश राजनकर हे मंडळाचे आद्य संस्थापक - त्यांच्या बरोबर कोठारी, द्रविड वगैरे मंडळी होती. मंडळ ८१ साली चालू झाले पण पहिले सोवेनियर ८३ सालचे आहे. तेव्हा पहिल्या दोन वर्षांच्या अध्यक्ष्यांचा उल्लेख हा पुढच्या अंकात आलेल्या यादीवरून सापडतो. राजनकर काकांबरोबर बोलतांना लक्षात आले की पहिली एक दोन वर्षे मंडळ हे म्हणजे काही मित्रांचा आणि त्या प्रत्येकाच्या ओळखीच्यांचा एक ग्रुप होता. पसारा वाढायला लागल्यावर काही कमिटी करावी, कार्यक्रमांसाठी पैसे गोळा करावेत असे वाटू लागले. म्हणजे अगदी काटेकोरपणे पाहिले तर राजनकर काका हे फॉर्मल अध्यक्ष कधीच नव्हते - पण ते ८ वर्षे नंतर उपाध्यक्ष होते. प्रत्येक वर्षी अध्यक्ष वेगळे पण उपाध्यक्ष - राजनकर काका ! ९६ साली राजनकर काका शेवटचे उपाध्यक्ष झाले - त्यानंतर ते कार्यकारिणीत सदस्य म्हणून ६ वर्षे राहिले (२०१३ साली त्यांचा सदस्य म्हणून उल्लेख आहे). ज्या संस्थेच्या स्थापनेत आपला सहभाग आहे तेथे इतक्या निरलसपणे त्यांनी केलेले हे काम खरोखर उल्लेखनीय आहे. राजनकर काकू एकदा उपाध्यक्ष (१९८७) - आणि नंतर एकदा सदस्य होत्या - आणि त्यांच्याच शब्दात सांगायचे तर - " .. अहो, बहुतांश कार्यक्रमाची प्रॅक्टिस आमच्याकडेच, मग कार्यकारिणीत नसूनही आम्ही असल्यातच ...".

राजनकर काकांनंतर - सारंग गाडगीळ हे दोन वेळा उपाध्यक्ष होते - बाकी सर्व एकेकदा उपाध्यक्ष होते. (२००४ - २००८ या कालावधीतले डिटेल्स नाहीत हे लक्षात घ्या !). २००१ साली पहिल्यांदा दोन कार्यवाह (secretary) आहेतआणि त्यानंतर २०१४ साली - ४ जण कार्यवाह असल्याचे दिसते. १९८७ सालची कार्यकारिणी विशेष उल्लेखनीय आहे. ही एकमेव all-woman कार्यकारिणी होती. श्रीमती नीरा राव अध्यक्ष होत्या आणि श्रीमती कुमुद राजनकर उपाध्यक्ष होत्या!!

खजिनदार हे पद १९८४ साली पहिल्यांदा आले. भाग्यश्री कुलकर्णी ४ वेळा खजिनदार होत्या, त्यानंतर ३ वेळा SY गोखले आणि हेमंत जोशी खजिनदार होते. इतर चार जणांनी दोन दोन वेळा खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळली आहे. एकापेक्षा जास्त कार्यवाह २००१ पासून आले तरी, दोन खजिनदार यायला २०१३ साल यावे लागले ! २००९ साली संपर्क अधिकारी हे एक नवीन पद निर्माण करण्यात आले. गंधाली सेवक, सारंग गाडगीळ आणि एकदा महेश सांगळे यांनी हि जबाबदारी सांभाळली आहे

मंडळाच्या सुरुवातीच्या दिवसात air force मधून बदलीच्या निमित्ताने आलेल्या अधिकाऱ्याचा सहभाग दिसतो. हि मंडळी एकदा दोनदा दिसतात - मग त्यांचा उल्लेख नाही - बहुधा बदलून 
बंगलोरच्या बाहेर गेल्याने त्यांचा सहभाग मर्यादित रहात असावा

अगदी सुरुवातीपासूनच सोवेनियर कमिटीचा उल्लेख सोवेनियर मध्ये आहे. २००३ पर्यंत साधारणपणे ३ जणांची ही कमिटी - २००३ नंतर ५ ते ६ जणांची दिसते. PM  जोग हे  सर्वात जास्त म्हणजे १० वेळा या कमिटीत दिसतात - तर त्यांच्या खालोखाल - सुभाष देवरे, स्नेहा केतकर आणि गंधाली सेवक यांनी प्रत्येकी ७ वेळा ही जबाबदारी उचलली आहे. राजीव नूलकर ६ वेळा तर सारंग गाडगीळ ५ वेळा या कमिटीत होते. यांच्या बरोबर एकंदरीत ३८ वेगवेगळीनवे  नावे या कमिटीत सापडतात

१९८३ ते २०१६ या कालावधीत मंडळाच्या कार्यकारिणीवर एकूण १२२ जणांनी सर्वसाधारण सदस्य म्हणून काम केले. अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे पदाधिकारी कार्यकारिणीतही असतात - पण १२२ हे य्त्या त्या वर्षी पदाधिकारी नसलेले सर्वसाधारण सभासद आहेत. कार्यकारिणीची सदस्य संख्या ठराविक दिसत नाही - २००२ पर्यंत १२ ते १५ पर्यंत असलेली ही समिती, त्यानंतर मात्र २०-२२ पर्यंत  membersगेलेली दिसते. १२२ - पैकी ५९ जण फक्त एकच वर्ष सदस्य होते. १९९९ नंतर फक्त एकच वेळा कार्यकारिणीत असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बंगलोर मध्ये सॉफ्टवेर इंडस्ट्री वाढल्याचे ते लक्षण असावे. दोन वर्षे काम करणारे २६ जण आहेत - आणि त्यातल्या १४ जणांनी लागोपाठची दोन वर्षे काम केले आहे. ३ वर्षे काम करणारे १२ जण आहेत - त्यातल्या ६ जणांनी लागोपाठ ३ वेळा ही जबाबदारी स्वीकारली आणि इतर ५ जण २ वर्षे बरोबर आणि कुठलेतरी १ असे काम केले आहे. ४ वेळा कार्यकारिणीवर असणारे ११ जण आहेत - त्यातल्या ४ जणांनी पाठोपाठच्या ४ वर्षात काम केले; इतर ५ जणांनी ३ आणि २ वर्षे पाठोपाठ काम केले. सुजाता कवी यांनी मात्र चार संपूर्ण वेगवेगळ्या वर्षी कार्यकारिणीवर हजेरी लावली! आरती सांगळे - या कार्यकारिणीवर ६ वर्षे सलग होत्या. राजनकर ७ वेळा, SY गोखले ८ वेळा, MJ सलगर १० वेळा, SS कोठारी ११ वेळा, SV द्रविड १२ वेळा कार्यकारिणीच्या यादींमध्ये सापडतात. पण सर्वात जास्त म्हणजे १९ वेळा किशोरी नालटे यांचे नाव कार्यकारिणी सदस्यांच्या यादीत सापडते

मंडळाच्या सर्वसाधारण सभासदांची यादी हे जाहिरातदार आणि वाचक या दोहोंसाठी एक आकर्षण. सुरुवातीच्या याद्या इंग्रजी मध्ये आहेत. खालचा आलेख हा मंडळाच्या सभासद संख्या वाढीचा आलेख आहे. २००० नंतर मंडळाची सभासद संख्या वेगाने वाढू लागली. २०११ मध्ये life members ची यादी वेगळी प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. २०१६ मध्ये मंडळाकडे १३६ life members आणि ८८१ साधारण सदस्य होते ! म्हणजे हा एकूण आकडा १०१७ होतोयातही, गिरीश अमलाडी - यांचे नाव १० वेळा पहिल्या क्रमांकावर आहे; त त्या नंतर आचरेकर याचा नम्बर लागतो - त्यांचे नाव ५ वेळा पहिले आहे. शेवटचे नाव बदलत गेले आहे - झुंझुरवाड हे जास्तीत जास्त वेळा - - सगळ्यात शेवटी आले आहेत


सुरुवातीचे सोवेनियर हे जाहिरातदारांसाठी असल्याने त्याचे मुखपृष्ठ साधेच असे. १९९२ मध्ये पहिल्यांदा मुखपृष्ठावर काही चित्र आहे. १९९६ पासून वेगळी कल्चरल कमिटी आली. दोन ठिकाणी - "सेक्रेटरी - ड्रामा' हे पद आहे. २०११ पासून, मित्रमंडळाचा सध्याचा लोगो मुखपृष्ठावर दिसू लागला. याच वर्षीपासून मुखपृष्ठ आणि निमंत्रण पत्रिका कमिटी स्वतंत्र झाली. या कमिटीवर आतापर्यंत १२ जणांनी काम केले आहे

सोवेनियर / स्मरणिकेचे हे २६ अंक. आणि त्यांचे हे विश्लेषण - मित्रमंडळाच्या वाढीचा आपल्या सर्वानाच अभिमान वाटेल असा आलेख
 (श्री राजनकर काकांच्या सहकार्याने)

अभिजीत टोणगावकर


No comments:

Post a Comment