' वेगळेपणाचा चकवा ! '

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा


खरच सगळ्यामध्ये राहून आपल वेगळेपण जपायला एक कौशल्य लागते. पण वेगळेपण असण्याचा अट्टाहास नको. खर वेगळेपण हे बहिरंगाच नसतच. फूल फुलाच्या क्षमतेने पूर्ण उमलत तेंव्हा त्याचा सुगंध दूरवर पसरतो. त्याला वेगळेपणा दाखवून द्यायची किंवा सिध्द करण्याची गरज उरत नाही. खऱ्या वेगळेपणाची उत्तुंगता कळली तर फोल वेगळेपण (चकवा) दूर सारता येईल. ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया पूज्य पेठेकाकांच्या खालील लेखातून...


पेठे काकांबद्दल 



डॉ. सुहास पेठे काका हे साताऱ्यातील आधुनिक दार्शनिक संत म्हणून ओळखले जातात. श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून ते श्री जे. कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत सर्व पंथांच्या उपासनेचे सार स्वतः आचरून सर्वसामान्य साधकांना सोप्या भाषेत सांगण्याचे असामान्य काम पेठे काकांचे आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठेकाका. चोवीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी करून २००१ मध्ये काकांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन उपासना व्यापक प्रमाणात चालू केली.
 त्यांचे वेगवेगळे उपक्रम जसे मौनमाळनामशिबिरेप्रश्नोत्तरसत्रेपदयात्राहरिजागरआत्मपरीक्षण शिबिरेमुलांची शिबिरेचिंतनसत्रचर्चा भेटी हे गेले अनेक वर्षे चालू आहेत. त्यांच्या जवळ जवळ १०० च्या वर पुस्तकांचे तसेच १२५ च्या वर व्हिडीओ सीडींचे प्रकाशन झाले आहे.


No comments:

Post a Comment