स्वयंसिद्धा!

क्यों शोभा, कल काम को नाही आई... कितना बर्तन था...” 
शोभाला ती घरात येताना विचारले. शोभा माझी बाई, काल अचानक तिने न सांगता दांडी मारली. तिचा चेहरा उतरलेला होता. “क्या बताउं अक्का... मेरा बच्चा बीमार था.” 

असे म्हणत ती कामाला लागली. भराभरा कामं उरकून ती गेलीसुद्धा. मुलं शाळेत गेलेलीच होती. माझे आवरून मी ऑफिसमध्ये निघाले. नवरा घरातून काम करतो म्हणाला आज. कपडे धुवायची बादली ओसंडून वाहत होती. याला सांगावं का... जाऊ दे, आहेत अजून दोन मिनिटं, म्हणून मशीन लावली. प्यायला पाणी घेताना लक्षात आलंपाणी संपलंय. नळ चालू केला. कळशी भरेपर्यंत माझं आटोपून घेतलं. भरकन आवरलंकेसावर कंगवा फिरवला. पाणी बंद करून पर्स घेऊन बाहेर पडलेसुद्धा... पाणी प्यायचंच राहिलं.

ऑटोत बसल्यावर ऑफिसच्या कामाची लिस्ट डोळ्यासमोर आली. अमक्या कामाचा फॉलोअप करायचा आहेतमकं काम याला द्यायचं आहेमीटिंगसाठी शीट तयार करायची आहे... आणि तुडुंब कामात बुडून गेले. कधी सहा वाजले कळलंच नाही. परत ऑटो. 

घरी येईपर्यंत ७ झाले. घरात शिरताना शेजारीण भेटली. “अभी आ रही हो शिल्पा?”
हां ऑन्टीजी!
कितनी थक गयी हो!” माझं फिलिंग कोणीतरी acknowledge केल्यावर हसत घरात आले. घरात परत संध्याकाळचा स्वयंपाक आ वासून उभा होता. थकून बिछान्यावर आडवी झाले.

मनात आले, आज मी माझ्या करियरबद्दल समाधानी आहे. घरी आधीपासूनच शिक्षणाचे वातावरण होते. आवडलेल्या विषयात शिक्षण घेण्याची आणि करियर करण्याची संधी मला मिळाली. आपल्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया बघतो ज्यांना कधी संधी मिळत नाही. Life is not fair all the time. कारणे वेगवेगळी असोत, पण सगळ्यांना समान संधी नाही. मग त्यांच्यासाठी आपण काय करू शकतोकळीचा प्रश्न आहे. उत्तर सोपं नाही. घरी राहणारी जी बाई असते तिला कधी कधी न्यूनगंड वाटतो. कारण घरकामाचे आपल्या समाजात मोल नाही. मग घरकामाचे जोपर्यंत मोल होणार नाही जोपर्यंत या स्त्रियांना आत्मसन्मान मिळणारा नाही. आत्मसन्मान हाच खरा मुद्दा आहे. मग हा मान द्यायचा कुणीकेव्हातर हा मान द्यायचा तिच्या नवऱ्यानेमैत्रिणींनीशेजारणींनी आणि सगळ्यांनी.

परवा एका समारंभात सगळ्या मैत्रिणी भेटलो. खूप दिवसांनी. नीता दिसली. तिच्या घरी थकलेले सासू-सासरे आणि लहान मूल.

काय गं, कशी आहेस?” नीताला विचारले.
बरी आहे.
सासूसासरे कसे आहेत तुझे?”
दोघांची तब्येत जरा हालुमालू असते अलीकडे.
हो का?”
काय करावं कळत नाही बघ,”
कशाचं?”
नवी नोकरी मिळणार होती... पण घरी कोण बघणार म्हणून नाही म्हटलं.

मग सारिका दिसली. सारिकाची दोन लहान मुलं. आदर्श गृहिणी. घर
टापटीपमस्त सजवलेलं. नवरा MNC त.

काय ग, सारिका मजेत का?”
हो अगंतू कशी आहेस?”
मस्त आणि बिझी!
माझं आपलं चाललं आहे मुलांना वाढवणं...
मग छान आहे की!
कसलं छान... मलाही वाटतं मस्त रोज बाहेर जावं नवनवीन कपडे आणि शूज घालून.
अगं पण बाहेर जाणं म्हणजे नुसतं तेच नाही काही... बॉसच्या शिव्या पण खायला लागतात.
तरीपण एकदा तरी नोकरी करावी वाटते बघ! नवरासुद्धा चिडवतो.
कर की मगमुलं मोठी झाली की आणि नवऱ्याशीही बोल नीट एकदा.
तोपर्यंत मला कोण घेणार? काही अनुभव नाहीसाधी BA झाले आहे मी.
मग तोपर्यंत वेळ आहे हाताशीशोध काहीतरीकाय आवडतं ते शीक.

अशा अनेक मैत्रिणींना आपण बघतोज्यांना काहीतरी करायचं आहे. पण कळत नाही नक्की काय ते. तुम्ही ‘तुम्हारी सुलू’ पहिला कासाधीशी गृहिणी. ती किती अस्वस्थ असतेकिती धडपड करते कुठेतरी पोचण्याची. त्यातून तिला काहीतरी क्लिक होतं. जमेल न जमेल माहिती नाही, पण इच्छा नक्की असते तिची. सगळ्यांनाच समान संधी मिळत नाहीत हे खरं आहेपण आहे त्या आपण ओळखू शकतो कात्याचा उपयोग करू शकतो का? “Opportunity knocks very softly”  असं म्हणतात. रिचर्ड ब्रानसन म्हणतो, “जर तुम्हाला एखादी संधी चालून आली आणि तुम्हाला माहिती नाही जमेल की नाही, तर हो म्हणा आणि नंतर ते काम शिकून घ्या.” तुम्ही जिथे आहात तिथूनच सुरुवात करा. रस्ता नक्की सापडेल.

प्रत्येक बाईला, मग ती कामवाली असोटायपिस्ट असोटेलर असोइंजिनिअर असो वा आणखी कुणी, प्रत्येकाला घरकाम आहेच, ते काही सुटलेलं नाही. माझी बाई शोभासुद्धा सगळे आटपून येते. आजकाल आपल्याकडे अद्ययावत यंत्रसामुग्री असते. मिनिटात कामं करणारी यंत्र असतात. पूर्वीपेक्षा अनेक कामं पटापट होतात. मग उरलेल्या वेळाचं काय करायचंतोच वेळ मैत्रिणींनो सत्कारणी लावू या. काहीतरी नवीन शिकू यावाचू याकरू या स्वयंसिद्धा होऊ या. आणि मुख्य म्हणजे आनंदी राहू या!

                             शिल्पा पराग 




No comments:

Post a Comment