असे कसे होते

का अजुनी गुंततो मी स्मृतींच्या जाळ्यांमध्ये
का अजुनी मज दिसेना मेखला गगनामध्ये||

का न स्फुरते काव्य मजला लेखणी हातामध्ये
का न घडते चित्र सुंदर मूर्त जरी नयानामध्ये||

का न पडती सूर कानी वेळूच्याही वनामध्ये
का न देती वास मोहक गुच्छ बहु हातामध्ये||

का न भिजतो देह माझा मेघ जरी तो कोसळे
का न थिजतो देह माझा हिम निरंतर पाघळे||

का न फुटते आर्त ओठी वेदना देहामध्ये 
का न तुटते स्वत्व माझे अवहेलना सर्वामध्ये||

उत्तरे सारी गवसली पाहता आरशामध्ये
राहिलो न सजीव मी बदललो अश्मामध्ये||

सुख-दु:ख-क्रोध-माया गोठली अंतरामध्ये 
कुणीही फेकावे उगाचच दगड म्हणून रस्त्यामध्ये||

फिरुनी होईन का सचेतन मूर्त मी सत्यामध्ये 
शोधती देवाधिकांना निर्जीव त्या दगडामध्ये||

हरवलो मी सजीव निर्जीव घोर या समरामध्ये 

बुडून जावे त्यापरी खोलवर सिंधूमध्ये||

--- आनंद गोगटे

1 comment: