Sunday, December 31, 2017

कट्टा - जानेवारी २०१८नमस्कार रसिक हो,

नूतन ख्रिस्त वर्षाच्या शुभेच्छांसह कट्ट्याचा हा जानेवारीचा अंक आपल्या हातात ठेवतांना संपादक समितीला मनापासून आनंद होत आहे.

कट्ट्याची मूळ संकल्पना जन्मास आली ती मित्रमंडळाच्या स्मरणिकेपासून. गेली जवळजवळ तीसहून अधिक वर्षे ही स्मरणिका दर गणेशोत्सवात प्रसिद्ध होत आहे.

कट्ट्याच्या या अंकात अभिजीत टोणगावकर यांनी स्मरणिकेच्या या प्रदीर्घ प्रवासाचा आढावा घेतला आहे. संस्कृत भाषेतील बालगीतांचा एक अनोखा व्हिडिओ सुद्धा या अंकात आहे. या वेळच्या अंकाचा विषय आहे 'संकल्प'. समितीच्या आवाहनाला प्रतिसाद उत्तम मिळून यावेळच्या अंकात वेगवेगळे लेख कविता स्फुटलेखन यांचा समावेश आहे.

या अंकात ललित कला अकॅडमीच्या स्पर्धेतील चार विजेते म्हणजे आभाशिवांगीगंधार व निमिष यांची चित्रे आहेत. या सर्वांचे व शिक्षिका नीना वैशंपायन यांचे कट्टा समितीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन.

येत्या वर्षात असेच वेगवेगळ्या विषयांवर अंक प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. त्या विषयांना सुद्धा असाच प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा.

धन्यवाद!

कट्टा समिती